नांदेड (प्रतिनिधी) – आठ ऑगस्ट रोजी सिडको भागात एका युवकाचा खून केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सक्षम मार्गदर्शनात पोलिसांनी एक महिला आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध सुरु आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा येथील इंदरजितसिंग बलजितसिंग बावरी (वय २५) यांचा खून करण्यात आला. ८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंग व त्यांचे चुलत भाऊ फायनान्सचे कामानिमित्त धनेगाव येथील पेट्रोल पंपावर गेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. पूर्वीच्या वादातून खंजराने वार करून इंदरजितसिंग यांचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत व फिर्यादी यांनी आठ दिवसांपूर्वी हिंगोली गेट येथून हप्ते थकीत असलेली बजाज पल्सर-२२० मोटारसायकल एजन्सीच्या सांगण्यावरून ताब्यात घेऊन एजन्सीच्या यार्डमध्ये जमा केली होती. यामुळे संबंधित आरोपींच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यातून पूर्वनियोजित कट रचून हा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात दिलीप पुंडलिक डाकोरे (३३), कृष्णा दिगंबर बारोळे (२९), रणजीत ऊर्फ रंज्या चांदू सूर्यवंशी (२३), ज्योती जगदिश बिगानिया (४०) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,120 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भंगार वेचणाऱ्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक PhD पदवी देणारेच आता संशोधनाला घाबरले ;उमर खालिदच्या पुस्तकाला प्रशासनाची इतकी भीती का?