नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ ऑगस्टच्या रात्री संगम कार बाजार परिसरात तीन अनोळखी व्यक्तींनी भंगार वेचणाऱ्या इसमाशी वाद घातला. त्यानंतर त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने गंभीर मारहाण करण्यात आली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तपासादरम्यान मृताची ओळख मंगल शंकर गवळी (रा. लोढेसांगवी, ता. लोहा) अशी पटली. पोलिसांनी सुजल ऊर्फ सुजित सुनील पोटभरे (वय २१, रा. श्रावस्तीनगर, नांदेड) याला ताब्यात घेतले असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात दारूच्या नशेत भंगार वेचण्याच्या जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.इतवारा पोलीस अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,209 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोषी की अक्षम? राहुल गांधींनी लोकसभेत मोदी-शाहांना विचारला जाब ? इंदरजितसिंग बावरीच्या खून प्रकरणात के बी गँगचे पाच जण पोलिसांच्या ताब्यात