नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील भाग्यनगर व भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून, या दोन्ही प्रकरणांत एकूण सुमारे 94 हजार 912 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यापैकी भोकर येथील चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भाग्यनगर येथील घटना : वामननगर येथील नवखेडे कॉम्प्लेक्समधील एका ब्युटी पार्लरचे प्लायवूड कापून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील ब्युटी पार्लरचे साहित्य, कॅमेरा, वॅक्सिंग अल्बम व इतर साहित्य असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी प्रियंका कुणाल काटकोडे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. भोकर येथील घटना : मुखेड रोडवरील फ्रेंड्स किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या राजेश गंगाधर राजरवाड (वय 18) व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल व चोरीत वापरलेला लोखंडी रॉड असा 49 हजार 912 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहम्मद अल्तमश मुस्तफा यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 828 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनुदानित युरिया खताची अवैध वाहतूक; धर्माबाद पोलिसांची दोन कारवाया, १३५ बॅग जप्त अवैध रेती वाहतुकीवर किनवट डीवायएसपींचा धडक कारवाईचा बडगा; 49.15 लाखांचा मुद्देमाल जप्त