भाग्यनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची जलद कारवाई, 80 हजारांचा मारवाडी घोडा मालकाला परत नांदेड (प्रतिनिधी): भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत चोरीला गेलेला सुमारे 80 हजार रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा हस्तगत करून मूळ मालकाच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी एका तरुणासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. रविनगर, नांदेड येथील डॉ. राघवेंद्र शिवाजीराव कुलकर्णी (वय 39) यांनी 19 जून रोजी रात्री जिरायत मैदान परिसरातून त्यांचा मारवाडी जातीचा घोडा चोरीला गेल्याची तक्रार भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 342/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. या कारवाईत शेख अदीन शेख यासीन (वय 20, रा. लेबर कॉलनी, नांदेड) याला व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला घोडा जप्त करून तो मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 904 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ; उद्या 6 जुलै रोजी उद्घाटन न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे नांदेडची न्यायव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर; ७ जुलैला वकिलांचा कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय