१७ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल; १ लाख ९७ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अवैध गुटखा विक्री व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत १७ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण १ लाख ९७ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने ३० जून रोजी ही कारवाई केली. पेट्रोलिंगदरम्यान पानटपरीवर बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण भागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवरही छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १६ जुगारींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपूर्ण कारवाईत गुटखा, पान मसाला, रोख रक्कम व इतर साहित्य असा मिळून १,९७,१८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध जुगार व बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,223 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा; ६.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या पाच घटना; लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला