नांदेड (प्रतिनिधी) : सत्यशोधक विचार मंच, नांदेड यांच्या वतीने आयोजित २१ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरेश दंडवते यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नरेश दंडवते यांनी १९९६ साली भोकरसारख्या ग्रामीण भागातून पत्रकारितेच्या प्रवासास सुरुवात केली. त्यानंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथील विविध नामांकित दैनिकांमध्ये कार्यरत राहून आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सत्यशोधक विचार मंचतर्फे आयोजित २१ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष तथा दैनिक लोकमत, पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक गोरक्ष लोखंडे, डॉ. जयवंत व्हटकर, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, मुख्य संयोजक पँथर गणेश शिंगे, स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, निमंत्रक जी. पी. मिसाळे, संयोजन समितीचे अध्यक्ष उन्मेश ढवळे, संयोजक लालबाजी घाटे, मुख्य समन्वयक ॲड. विजय गोणारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नरेश दंडवते यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Kanthak Suryatal Post Views: 730 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तोष्णीवाल मेडिकल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलुरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांची गोवा सहल चर्चेत; व्हायरल व्हिडिओंमुळे राजकीय वर्तुळात खळबळ