हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी गुरुवारी, ४ जून २०२४ रोजी जिल्ह्यातील १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये ८ पोलीस निरीक्षक (PI) आणि ७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा (API) समावेश आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या बदल्या आणि नियुक्त्या खालीलप्रमाणे आहेत: पोलीस निरीक्षक (PI) स्तरावरील बदल्या: संदीप खंडेराव मोदे : हिंगोली शहर पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा, हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे . देवेन्द्रसिंह बहादूरसिंह ठाकूर: यांची हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विष्णुकान्त तुकाराम गुट्टे: आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली. श्यामकुमार परमेश्वर डोंगरे: हिंगोली ग्रामीण येथून औंढा (ना.) पोलीस ठाण्यात बदली. प्रेमप्रकाश मारोतराव माकोडे: कळमनुरी येथून पोलीस नियंत्रण कक्ष, हिंगोली येथे बदली. जमीर अब्दुल गनी नाईक: जिल्हा विशेष शाखेतून कळमनुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी नियुक्ती. शरद सुभाष मरे: शहर वाहतूक शाखेतून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बदली. शेख गफार शेख खलील: पोलीस नियंत्रण कक्षातून शहर वाहतूक शाखा, हिंगोली येथे बदली. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) स्तरावरील नियुक्त्या: रामदास महाजन निरदोडे: कुरुंदा पोलीस ठाण्यातून वसमत ग्रामीण येथे बदली. नव्याने हजर झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये महादेव शिवाजी पुरी (पो.स्टे. कुरुंदा), संग्राम उद्धव जाधव (पो.स्टे. वसमत शहर), संदीप आनंदराव बोरकर (पो.स्टे. हट्टा), अयुब हिराजी शेख (पो.स्टे. औंढा ना.), आणि उमाकांत वैजनाथ पुणे (पो.स्टे. कळमनुरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत शिवलिंग आरसेवार यांची सायबर पोलीस ठाणे, हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन पदभार स्वीकारावा आणि त्याचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. या मोठ्या फेरबदलामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून प्रशासकीय कामकाजात गती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,602 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कॉकरोच जनता पार्टी;जुन्या आणि धोकादायक मॉडस ऑपेरंडीचा हात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त