हदगांव – मागील तीन साडे तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकामं उप विभाग हदगांव येथे कार्यरत सहाय्यक अभियंता श्रेणी -1 दिलीप हनुमंतराव बोबडे यांना अखेर आज बदलीच्या ठिकाणी मुख्य अभियंता नांदेड यांनी कार्यमुक्त केले आहें श्री दिलीप बोबडे हे हदगांव येण्यापूर्वी त्यांनी किनवट येथे आदिवासी विकास उपविभाग येथे 3 वर्ष काम केले होते तत्कालीन सरकारच्या काळात त्यांनी आपली बदली हदगांव येथे करून घेतली होती त्यांचा कार्यकाळ फारसा समाधान कारक नसला तरी त्यांचे कार्यालयीन अंतर्गत त्यांचे कनिष्ठ अधिकारी यांच्याशी फार जमले नाही त्यामुळे अंतर्गत कुरघोड्या चव्हाट्या वर येत होत्या अनेक कामात अनियमितता तक्रार याचे प्रमाण वाढले होते मात्र त्या काळात बोबडे यांना संभालून घेणारे वरिष्ठ अधिकारी त्यांचे सहकारी असल्याने फारसे त्यांची प्रकरणे बाहेर आली नव्हती मात्र हदगांव चे आमदार बाबुराव कदम यांनी त्यांच्या विरोधात अर्थ संकल्पिय अधिवेशनात ब्रम्हवाडी ता हदगांव येथील कामाच्या बाबतीत अंदाज पत्रक चुकिचे बनवून शासनाला करोडो रुपयाचा चुना उप अभियंता बोबडे कनिष्ठ अभियंता राठोड यांनी कश्या पद्धतीने लावला याचे विवेचन केले होते पुढे या तक्रारी चे काय झालें ती तक्रार कोणाच्या माध्यमातून बासणात गुंडाळली गेली ह्याची चर्चा चविष्ठ पणे मोठ्या प्रमाणात होत आहे त्या सह पुनर्वसन च्या कामात मोठ्या प्रमाणात गावागावातून तक्रारी आल्या त्या पन गायब झाल्या होत्या एवढेच नाही तर हदगांव जवळील भानेगाव ह्या गावातील पुनर्वसन गावातील कामे जुन्या गावात करून बोबडे व त्यांच्या सहकार्याकडून शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याची तक्रार झाली होती दरम्यान वादग्रस्त परंतु कार्यकाळ पूर्ण झाल्याने मागच्या महिन्याच्या अखेरीस बोबडे यांची शासनाने हदगांव येथील जिल्हा परिषद बांधकामं उपविभाग येथील रिक्त पदावर बदली केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समुद्रात विहार करण्याची सवय झाल्याने त्या मानाने दुय्यम जिल्हा परिषद सारख्या ओढ्या (फक्त कामाच्या दृष्टीने ) काम नको म्हणून त्यांनी काही कंत्राटदार मार्फत एका लोकप्रतिनिधी मार्फत बदली ला स्थगिती साठी प्रयत्न सुरु केले होते मात्र त्यांना संपशेल अपयश आले असून काल अखेर बदली आदेशाचे पालन करून दिलीप बोबडे यांना मुख्य अभियंता नांदेड रूपा राऊळ गिरासे यांनी कार्यमुक्त करून तसा अहवाल शासनाला दिल्याने बोबडे यांचा स्वप्न भंग झाला असून त्यांना आपला गाशा गुंडालावा लागणार आहें Kanthak Suryatal Post Views: 550 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विद्यार्थ्यांचा एल्गार: शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि सरकारचा निगरगट्टपणा महायुतीचा धर्म पाळत प्रवीण पाटील चिखलीकर उमेदवारी मागे घेणार; अमर राजूरकरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा