हिमायतनगर – येथील कीर्तनकार व लढाऊ कामगार कार्यकर्ते बाबुराव डांगे यांचे अल्प आजाराने दि. १६ मे रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास निधन झाले. ते ऐंशी वर्षांचे होते.ऐन तारुण्यात त्यांनी कीर्तनकार म्हणून तर आयुष्यभरही एक भजनी म्हणून ईश्वरसेवा केली आहे. तसेच गरीब आणि कामगारांसाठी त्यांनी उपोषणांचाही मार्ग अनेकदा अवलंबला आहे. त्यांच्या रूपाने सर्वसामान्यांचा एक लढाऊ कार्यकर्ता हरपला आहे. त्यांच्यावर आज दि. १७ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व नातू, पणतू असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 522 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून कुंटूर येथे गुटखा जप्त न्याय के देवता और कॉकरोच रूपी युवा: जब रक्षक ही भक्षक की भाषा बोलने लगे