महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी

मुंबई (प्रतिनिधी) –  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील भारतीय पोलीस सेवा (IPS) तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या आणि पदोन्नती जाहीर केल्या आहेत. १५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार विविध पोलीस आयुक्तालय, विशेष शाखा, प्रशिक्षण संस्था आणि परिक्षेत्रांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

अपर पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक स्तरावरील बदल्या

कृष्ण प्रकाश यांची फोर्स वन येथून अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता कराळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र येथून राज्य मानवाधिकार आयोगात बदली करण्यात आली. प्रवीण पडवळ यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

लखमी गौतम यांची मुंबई गुन्हे शाखेतून विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) पदावर नियुक्ती करण्यात आली असून मनोज शर्मा यांची मुंबई पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली झाली आहे. सुहेल हक यांची पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

महेश पाटील यांना पदोन्नती देत विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) पद देण्यात आले आहे. परमजीत दहिया यांची दहशतवाद विरोधी पथकात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सी. के. मीना यांची कोकण परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे.

संजय दराडे यांची पुणे पोलीस सह आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून रंजन शर्मा यांना कोल्हापूर परिक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील फुलारी यांची गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) येथे बदली झाली आहे. राजेश प्रधान यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस सह आयुक्तपद देण्यात आले आहे.

विशीथ मिश्रा यांची प्रशिक्षण विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. जय कुमार यांची फोर्स वनमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. संजय येनपुरे यांच्याकडे व्हीआयपी सुरक्षा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दीपक साकोरे यांना पदोन्नती देत नवी मुंबई पोलीस सह आयुक्तपद देण्यात आले आहे. पंजाबराव उगले यांची पोलीस गृहनिर्माण महामंडळात बदली झाली असून एस. व्ही. पाठक यांची आर्थिक गुन्हे शाखेत विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनायक देशमुख यांना नियंत्रक, वैधमापन पद देण्यात आले आहे.

ज्योती प्रिया सिंग यांची अंमली पदार्थ विरोधी पथकात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. अनिल कुंभारे यांची मुंबई गुन्हे शाखेत पोलीस सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून सत्य नारायण चौधरी यांना वाहतूक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नंदकुमार ठाकूर यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज येथून महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी. आर. पाटील यांची पुणे शहर पोलीस उप आयुक्त म्हणून बदली झाली आहे. जयंत मीना यांना मुंबईहून बृहन्मुंबईत पोलीस उप आयुक्तपद देण्यात आले आहे.

लोहित मतानी यांची महामार्ग सुरक्षा, नागपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. संजय बारकुंड यांची जालना येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ३ च्या समादेशकपदी बदली झाली आहे. प्रशांत मोहिते यांची छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस उप आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अदित्य मिरखेलकर यांची नागपूर शहरात पोलीस उप आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून गौहर हसन यांची पुणे शहरात बदली झाली आहे. नित्यानंद झा यांना यवतमाळ पोलीस अधीक्षकपद देण्यात आले आहे. शफकत आमना यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती झाली आहे.

अभयसिंह देशमुख यांची बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. कुमार सचिता यांची नागपूर शहरात बदली करण्यात आली असून अन्नपूर्णा सिंह यांनाही नागपूर शहरात पोलीस उप आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एम. किरीतिका यांची नाशिक येथील गुन्हे दोषसिद्धी प्रशिक्षण विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व बदल्या आणि पदोन्नती पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार करण्यात आल्या असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार शासनाने हा आदेश जारी केला आहे.

सोबत बदली आदेशाच्या दोन पीडीएफ संचिका वाचकांच्या सोई साठी जोडल्या आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!