नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक १७१/२०२६ व १६३/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबीनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने ही मोहीम राबवली. पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्यासह पोलीस अंमलदार रवींद्र बामणे, शेख अरशद, रितेश कुलथे, अनिल बिरादार, दीपक ओढणे व सागर राठोड यांनी सहभाग घेतला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख नदिम शेख महेबूब (वय २२, रा. मालेगावखेडी), शेख रेहान उर्फ भोंडी शेख अय्यूब (वय १९, रा. मखदुम नगर, नांदेड) यांचा समावेश असून शेख गॉस शेख माजिद (वय २२, रा. कामठा, नांदेड) हा फरार आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून अंदाजे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ४,५६,००० रुपये) व २०० ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत ४८,००० रुपये) असा एकूण ५,०४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 941 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांची धडक मोहीम; चौथ्या दिवशी ७३ गुन्हे, ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त भाजपची सिक्रेट सिस्टीम आणि निवडणुकांचे टेलर-मेड निकाल: यशवंत सिन्हा यांच्या गौप्यस्फोटाचे सविस्तर विश्लेषण