नांदेड : नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून चौथ्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९९ जणांविरुद्ध कारवाई करत तब्बल ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या चौथ्या दिवशी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध ४ गुन्हे दाखल करून सुमारे ५४.३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुटखा विक्री प्रकरणी २ कारवाया करून १५ हजार ३४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मटका-जुगार प्रकरणात ४२ जणांविरुद्ध कारवाई करत २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कडक कारवाई करत ४१ गुन्हे दाखल केले असून ४४ आरोपींकडून २१.०९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय शस्त्र अधिनियम, कोटपा व इतर कायद्यांखालीही कारवाया करण्यात आल्या आहेत. या सर्व कारवायांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली असून नागरिकांनी ९१५०१००१०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या हेल्पलाइनमुळे नागरिकांचा विश्वास वाढत असून अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत होत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले. Kanthak Suryatal Post Views: 648 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उपमहानिरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक या शब्दातील अर्थ न समजणाऱ्या याहियाच्या बातमीची चेष्ठा विमानतळ हद्दीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त