नवीन नांदेड (प्रतिनिधी) – जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी भाऊजीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता माननीय न्यायालयाने त्यांना २९ एप्रिल २०२४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना जेरबंद केल्याने या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मित्रनगर, बळीरामपूर परिसरातील विजय साहेबराव शिंदे (वय ३५) यांच्या खूनप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी साहेबराव बाबू वाघमारे (वय २४) व विशाल अनिल जाधव (वय २५) या दोघांना अटक केली. दोघेही मयताचे मेव्हणे असल्याचे तपासात समोर आले आहे. शनिवारी रात्री इतवारा परिसरात तिघांनी एकत्र दारू पार्टी केली. त्यानंतर मटण जेवण करून फिरत फिरत बळीरामपूरजवळील जंगलसदृश ओसाड भागात गेले. पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी धारदार शस्त्रांनी विजय शिंदे यांच्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी आरोपी साहेबराव बाबू वाघमारे व विशाल अनिल जाधव यांना न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. माननीय न्यायालयाने युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपींना २९ एप्रिल २०२४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संबंधित बातमी …. दारू पाजून ; भाऊजीचा खून, दोन मेव्हणे अटकेत Kanthak Suryatal Post Views: 1,301 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पातळी वाॅटरबेल! अति उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी