नांदेड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव (म.) ता.कमालनगर जिल्हा बिदर (कर्नाटक) येथील शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन 2025-26 हे दि.6 मार्च 2026 शुक्रवार रोजी भव्य दिव्य अशा स्वरूपात साजरा झाला. सर्वप्रथम सरस्वती प्रतिमेचे पुजन डोनगाव, रंड्याळ, हावगी स्वामी मठ ता.उदगीरचे महाराज श्री शिवलींग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते पुजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले. यावेळी मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून वार्षीक स्नेह संमेलन महोत्सवाला सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास मंठाळे हे हेते तर उद्घाटक म्हणून डोनगाव, रंड्याळ, हावगी स्वामी मठ ता.उदगीरचे श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज हे होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महोत्सव मंचावर औराद तालुका नोडल अधिकारी प्रा.लक्ष्मण तुरे, औराद तालुका शिक्षण संयोजक राजकुमार नाईकवाडे, डोनगाव (म.) शाळेचे केंद्रप्रमुख रमाकांत काळे, सामाजीक कार्यकर्ते शेषेराव सुर्यवंशी, माजी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड नांदेड, विजयकुमार तुरे, रवि सुर्यवंशी, शाळेचे शिक्षकवृंद धनाजीराव घाटचिरले, शिवकुमार मेंडसे, धनराज म्हेत्रे, श्रीमती रत्नाबाई पंढारे, संदेशकुमार हांडे, सदाशिव तडकल, विरेश लीगाडे, विजयकुमार म्हेत्रे, छाया चित्रकार बाळू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संयोजन समितीच्यावतीने वरील सर्व मान्यवरांचा शाल-पुष्पहार देवून ह्दय सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपरोक्त सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. यानंतर शाळेतील बाल कलाकार विद्यार्थी-विद्यार्थीनीनीं विविध गाण्यावर, विविध संगीतावर आप आपली नृत्यकला आविष्कार विविध गुणदर्शनाची आदाकारी सादर करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास मंठाळे यांनी करून आपले मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक धनाजीराव घाटचिरले यांनी केले तर सुत्रसंचालन सुरेख अशा आवाजात धनराज म्हेत्रे यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षीका श्रीमती रत्नाबाई पंढारे यांनी मांडले. या वार्षीक स्नेह संमेलन महोत्सवास सर्व पालक वर्ग व डोनगाव (म.) नगरीतील सर्व समाज बंधू-भगिनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 513 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation संस्कार आणि संस्कृती स्त्रियांमुळेच टिकून आहे – राम तरटे सायकल यात्रा करके सचखंड श्री हजूर साहिब आनेवाले युवको का सन्मान