माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कौशल्य विकासासाठी 13 मार्च रोजी समुपदेशन

नांदेड – नांदेड जिल्हा व अधिपत्याखालील क्षेत्रात माजी सैनिक व त्यांच्या विधवांची संख्या 1 हजार 834 इतकी आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य कौशल्य विकास व पुनर्वसनाची संधी मिळावी यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरावर विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समुपदेशन कार्यक्रम शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा सैनिक कार्यालय, नांदेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

या समुपदेशन कार्यक्रमाद्वारे माजी सैनिकांना जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत त्यांच्या कौशल्यानुसार योग्य तांत्रिक अथवा शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय व निमशासकीय नोकरीच्या संधींबाबत माहिती, आवश्यक प्रमाणपत्रांविषयी मार्गदर्शन, रोजगाराच्या संधींबाबत सल्ला तसेच पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या शैक्षणिक व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!