नांदेड – जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून . बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 10 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 521 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ग्रामीण रुग्णालय भोकर येथे राज्यस्तरीय NQAS मूल्यांकन संपन्न अर्धापूर शहरातील खुबा कॉलनी 132केव्ही परिसरामध्ये समस्यांचा डोंगर; ‘तथाकथित’ विकास फक्त कागदावरच?