नांदेड येथील घटक कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव संपन्न
नांदेड – घटक कृषी तंत्र विद्यालय येथे करण्यात आले होते , या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत असताना प्रमुख पाहुणे श्याम सुंदर कदम, संचालक गोविंदराव पोळ कृषी तंत्र विद्यालय, बन चिंचोली यांनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ प्रा. इंद्रमनी, विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ. भगवान असेवार व विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता शिक्षण डॉ गजेंद्र लोंढे यांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासात मदत करणारा व त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा क्रीडा महोत्सव नांदेडच्या मध्यवर्ती घटक कृषी तंत्र विद्यालय आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रसंगी बोलत असताना त्यांनी पुढे सदर क्रीडा प्रकाराचे आयोजन हे शिक्षणासोबत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ .शिवाजी शिंदे संयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय गोळेगाव हे होते तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कुठल्या न कुठल्या खेळाची आवड जोपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत अध्यक्षीय समारोपात बोलत असताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य घटक कृषी तंत्र विद्यालय नांदेड डॉ .नरेश कुमार जायेवार यांनी केले.
सदर प्रास्ताविकामध्ये क्रीडा महोत्सव आयोजित करण्यामागे असणारी कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इंद्रमणी सर, शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ भगवान असेवार सर व सहयोगी अधिष्ठाता शिक्षण डॉ. गजेंद्र लोंढे यांची प्रेरणा व पार्श्वभूमी विषद केली. सदर कार्यक्रमासाठी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र चे प्रभारी अधिकारी डॉ अरविंद पांडागळे तसेच केळी संशोधन केंद्र येथील सहाय्यक उद्यानविद्याविता डॉ.सुजाता धूतराज व अजगर अली अध्यक्ष कबड्डी असोसिएशन नांदेड हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवाची सुरुवात ही पतसंचलनाने करण्यात आली, जात एकूण नांदेड जिल्ह्यातील सात कृषी तंत्र विद्यालयाचे संघ सहभागी झाले होते.
क्रीडा महोत्सवातील क्रीडा स्पर्धांची सुरुवात ही कबड्डी सामन्याने करण्यात आली या प्रकारात बन चिंचोली येथील संघ हा विजेता तर भोकर कृषी तंत्र विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला यानंतर खो खो स्पर्धेचे सामने घेण्यात आले ज्यात कृषी तंत्र विद्यालय बंद चिंचोली हा संघ विजेता तर कृषी तंत्र विद्यालय नांदेड हा संघ उपविजेता ठरला यानंतर व्हॉलीबॉल चे सामने घेण्यात आले जात कृषी तंत्र विद्यालय भोकर चा संघ विजयी ठरला तर कृषी तंत्र विद्यालय लोहा चा संघ उपविजेता ठरला. मुलींच्या सांघिक स्पर्धेमध्ये रस्सीखेच या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता ज्यात कृषी तंत्र विद्यालय नांदेड येथील संघ विजेता तर कृषी तंत्र विद्यालय वळग येथील संघ उपविजेता ठरला. या क्रीडा स्पर्धेच्या सांघिक खेळानंतर दिनांक पाच मार्च 2026 रोजी संगीत रजनीचे देखील आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध कलागुणांचे सार्थ प्रदर्शन केले. यानंतर दिनांक 6 मार्च रोजी व्यक्तिगत क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे गोळा फेक लांब उडी तसेच मुलींचे 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे संगीत खुर्ची टिपक्याची रांगोळी ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या क्रीडा महोत्सवाचा समारोप पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाने करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रकाश शिंगरवाड, वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी तंत्र विद्यालय नांदेड, श्री.विजेश जाधव कनिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी तंत्र विद्यालय नांदेड, स्वाती ताटपल्लेवार, वरिष्ठ लिपिक, श्रीमती महानंदा उत्तरवार वरिष्ठ लिपिक, कृषी तंत्र विद्यालय नांदेड यांनी विशेष प्रयत्न केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालय नांदेड येथील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कुमारी प्रणिता बल्लेवाड व पोकळे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर नरेश कुमार जायवार यांनी मानले.
