काल युद्धाच्या सातव्या दिवशी इराणने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक हल्ला केला. हा हल्ला अशा ठिकाणी करण्यात आला, जे इस्रायलच्या सर्वात गुप्त लष्करी केंद्रांपैकी एक मानले जाते. या ठिकाणाची माहिती अत्यंत मर्यादित लोकांनाच होती. चार शक्तिशाली क्षेपणास्त्रांनी हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगितले जाते आणि या कारवाईची जबाबदारी Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने स्वीकारली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील पाश्चिमात्य माध्यमे या घटनेवर जवळजवळ शांत आहेत. इतकेच नाही तर या हल्ल्याची कल्पनाही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू किंवा इस्रायलच्या हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आधी मिळाली नाही, असे सांगितले जाते.
IRGC च्या म्हणण्यानुसार हा हल्ला इस्रायलच्या मध्यभागातील अत्यंत गुप्त लष्करी तळावर करण्यात आला. हा तळ म्हणजे Sdot Micha Airbase. इस्रायलच्या हवाई दलासाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आणि गुप्त मानले जाते. येथे केवळ विमान किंवा सामान्य शस्त्रे नाहीत, तर इस्रायलची संभाव्य अण्वस्त्र साठवणूक असल्याचे अनेक तज्ञ आणि गुप्तहेर संस्थांचे मत आहे. अधिकृतरीत्या इस्रायल कधीही अण्वस्त्रे असल्याचे मान्य करत नाही. तरीही अनेक देश आणि गुप्तचर संस्था असा दावा करतात की या ठिकाणी अण्वस्त्रांचा साठा आहे. काही अहवालांनुसार येथे इस्रायलची शक्तिशाली Jericho III missile प्रणालीसुद्धा तैनात आहे.
या हल्ल्यात वापरलेली इराणी क्षेपणास्त्रे १५०० ते २००० किलोमीटर अंतरावर लक्ष्य भेदू शकतात. त्यांची गती ताशी सुमारे १४ ते १५ हजार किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच अवघ्या १२ मिनिटांत ती इस्रायलच्या कोणत्याही शहरात पोहोचू शकतात. तज्ञांच्या मते ही क्षेपणास्त्रे इतकी प्रगत आहेत की इस्रायलची प्रसिद्ध संरक्षण प्रणाली Iron Dome देखील त्यांना थांबवू शकत नाही. माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे थेट Sdot Micha एअरबेसच्या रडार प्रणालीवर आदळली आणि त्या रडारचे मोठे नुकसान झाले. जर खरोखरच त्या ठिकाणचे रडार नष्ट झाले असतील, तर याचा अर्थ इस्रायलच्या अण्वस्त्र साठ्याचे संरक्षण कमकुवत झाले आहे. त्यामुळे पुढील हल्ले थेट त्या अण्वस्त्र साठ्यावर होऊ शकतात, अशी भीती तज्ञ व्यक्त करत आहेत.



काही अहवालांनुसार ही माहिती इराणला रशियाच्या गुप्तचर संस्थांनी दिली. त्यावर आधारित योजना आखून हा हल्ला करण्यात आला, असे सांगितले जात आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र The Washington Post नेही या संदर्भातील काही माहिती जगासमोर आणली आहे. या सर्व घटनांमुळे परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे. रशियाचे राष्ट्रपती वाल्डीमीर पुतीन हे इराणला गुप्तपणे मदत करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
इराणने या हल्ल्याद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे इस्रायलच्या सर्वात गुप्त ठिकाणांपर्यंतही आम्ही पोहोचू शकतो. इराणकडे आता इस्रायलच्या अनेक संवेदनशील माहितीचा मागोवा असल्याचे संकेत यातून मिळतात. युद्धाच्या पहिल्या सहा दिवसांत इराणने जुन्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. परंतु सातव्या दिवशी त्यांनी अत्याधुनिक आणि अधिक शक्तिशाली क्षेपणास्त्रे वापरायला सुरुवात केली. या नवीन क्षेपणास्त्रांची गती, अचूकता आणि मारक क्षमता खूप जास्त आहे, त्यामुळे पारंपरिक हवाई सुरक्षा प्रणाली त्यांना रोखण्यात अपयशी ठरत आहे.
या युद्धाने जगात एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे अमेरिका खरोखरच अजूनही तितकीच प्रभावी महासत्ता आहे का? अनेक तज्ञांच्या मते या संघर्षामुळे अमेरिकेच्या शक्तीबद्दलचा भ्रम मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. दरम्यान अशीही चर्चा आहे की पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू हे सुरक्षित गुप्त विमानाने जर्मनीत पोहोचले आहेत. जर हे खरे असेल तर इस्रायलचे नेतृत्व पुढे कोण करणार, आणि युद्धाची दिशा काय असेल, हा गंभीर प्रश्न उभा राहतो.
एकूण परिस्थितीकडे पाहता युद्धामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे इस्रायलचे, अमेरिकेचे आणि जगाचेही. पण सध्याच्या घडीला या संघर्षात वरचष्मा मात्र इराणचाच दिसत असल्याचे अनेक विश्लेषकांचे मत आहे.
