नांदेड (प्रतिनिधी)- प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी 06:00 ते सायंकाळी 20:00 वाजेपर्यंत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवर सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक / नांदेड शैलेश कुमार सिंह यांनी देखरेख ठेवली. या विशेष मोहिमेत 28 तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले असून विविध मार्गांवरील 25 गाड्यांची तपासणी करण्यात आली. या सखोल तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास तसेच अनबुक्ड सामान यांची एकूण 500 प्रकरणे आढळून आली असून त्यावर रेल्वे नियमांनुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये 449 विनातिकीट प्रवास (TWT) प्रकरणांमधून ₹2,14,410 भाडे व ₹1,15,190 दंड वसूल करण्यात आला. तसेच 15 अनियमित प्रवास (IRT) प्रकरणांमधून ₹3,730 भाडे व ₹3,750 दंड वसूल करण्यात आला. याशिवाय 36 अनबुक्ड लगेज (UBL) प्रकरणांमधून ₹5,500 रक्कम वसूल करण्यात आली.अशा प्रकारे या एकदिवसीय विशेष मोहिमेत 500 प्रकरणांमधून एकूण ₹3,42,580 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. प्रवाशांना आवाहन रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी नेहमी वैध तिकीटासहच प्रवास करावा तसेच प्रवासादरम्यान सोबत असलेले सामान नियमानुसार बुक करावे. विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणे हे रेल्वे कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे. सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे. Kanthak Suryatal Post Views: 790 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अगोदर तेल नंतर गॅस आणि आता अलुमिनियमवर इराणचा हल्ला योजना सुरू… समस्या कायम — शहर विकासाचा वास्तव अहवाल