नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल पावडेवाडी येथील विद्यार्थिनीने पर्यावरणातून उपक्रम राबवत वेस्टेज बॅनरपासून उपयुक्त पिशव्या निर्मिती केली आहे. इयत्ता सहावी वर्गात शिकणारी कुमारी श्रीजा संतोष इमडे यांनी हा उपक्रम हाती घेतला.
शहरामध्ये विविध कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर बॅनर व फ्लेक्स वाया जातात या वेस्टेज साहित्य योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा उद्देशाने तिने या बॅनरपासून आकर्षक आणि टिकाऊ पिशव्या तयार केल्या. या पिशव्या वापरण्यासाठी उपयुक्त असून प्लास्टिकचा वापराला पर्याय ठरत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण बाबत जागृती करताना निर्माण होत आहे. तसेच कचऱ्यापासून उपयोगी वस्तू तयार करण्याची सवयही विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून विविध आकाराच्या पिशव्या तयार केल्या असून त्या वाटपाही करण्यात आल्या.
शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचा या प्रयत्नाचे कौतुक केले आहे पर्यावरणा च्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. वेस्टेज बॅनर पुनरवापर करून आपण पर्यावरणाच्या दिशेने एक छोटा पण महत्वाचा पाऊल उचलला आहे.
