नांदेड – जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापना मध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 9 मार्च 2026 सकाळी 10 ते 2 पर्यत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्कासाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar0१@gmail.com दुरध्वनी क्रमांक02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 507 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नवाबों का शहर – एक गंभीर आत्ममंथन कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर १५ व १६ मार्चला जिल्हा कृषी व धान्य महोत्सव;१०० स्टॉलची उभारणी