नांदेड – छत्रपती राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या समिती वरती नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ कलावंत गुरुनाथ पेंढारकर यांची निवड झाली आहे असे पत्र जिल्हाचे पालकमंत्री अतुल सावे व जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध केले आहे. गुरुनाथ पेंढारकर हे गेले पाच दशकापासून लोक कलेच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर देत आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन लोहा कंधार मतदार संघातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शिफारशीवरून त्यांची नियुक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली आहे त्यांची निवड होताच मंत्रालयीन सांस्कृतिक शाखेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ नेते प्रभू सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे त्याच्या सत्कारास मंत्रालयीन सांस्कृतिक शाखेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे जिल्हाध्यक्ष गंगाधर ओढणे प्रा. अविनाश नाईक सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनकांबळे ललकार बाबू धोंडोपंत चौधरी मारुती चौदंते काशिनाथ कुऱ्हाडे शामराव वाघमारे व्यकटी आठवले भिमराव दाभडकर व्हि. एस. कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभू सावंत यांनी त्यांच्या मनोगत रघुनाथ पेंढारकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत हे तळागाळातील कलावंतांसाठी न्याय देणारे व त्यांच्यासाठी लढणारे व्यक्तीमत्व आहे लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती जनजागृतीचे त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांच्या निवडीचे स्वागत अगदी मनापासून मी करतो व भावी कार्यास त्यांना मनापासून शुभेच्छा देतो असे आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश नाईक केले तर प्रास्ताविक व आभार गंगाधर वडणे यांनी व्यक्त केली. Kanthak Suryatal Post Views: 649 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रक्ताची होळी आणि महासत्तेचा अहंकार थडीसावळी येथे तरुणाचा खून; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल