लतिफ पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव

नांदेड  – जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक लतिफ इमामखान पठाण शनिवार दिनांक 28 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झाले. यानिमित्ताने महसूल परिवाराचेवतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे हस्ते शालभेटवस्तू देऊन पठाण दांपत्याचा गौरव करण्यात आला. यावेळी तहसीलदार शंकर लाडउषा इज्जपवारभगवान हंबर्डेवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद  मालशेटवारडॉ.अनिल पोपुलवारडॉ.पतंगेकिशोर कुऱ्हेनीरज धामणगावे उपस्थित होते.

 प्रीती डहाळेसंदीप ढवळे यांनी पीपीटी सादरीकरणातून तर डॉ. स्वाती अलोनेरोशनसिंग ग्रंथीप्रकाश कांबळेसोपान गुंडाळेबारकुजी मोरेबालाजी जाधव यांनी मनोगतातून पठाण यांचा सेवाकाळ मांडला. प्रास्ताविक प्रसाद  शिरपूरकर आभार सिद्धार्थ बुक्तरे यांनी तर सूत्रसंचालन बालासाहेब भराडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरीक प्रतिनिधी बी. जी. मोरे यांचेसह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!