नांदेड – शहरातील नवोदित कवयित्री निलम नांदेडकर (कुलकर्णी) यांच्या आनंदी चांदणे या ललित काव्यसंग्रहाचे रविवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनातील आलेले अनुभव.. समाजातील संवेदनशीलता.. निसर्ग…जीवन शैली.. आदी विषयावरच्या त्यांच्या या कविता आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री व स्त्री रोग तज्ञ डॉ.वृषाली किन्हाळकर व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी डॉ.जीवन पिंपळवाडकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.दिगंबर भास्करराव जोशी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा दि.२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजीनगर येथील हॉटेल अतिथी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास निमंत्रितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निलम प्रसाद नांदेडकर (कुलकर्णी) व प्रसाद प्रकाशराव नांदेडकर यांनी केले आहे.
More Related Articles
राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मेंदु विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 ते 21 सप्टेंबर मोफत आरोग्य शिबिर
नांदेड(प्रतिनिधी)-मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर असे तीन दिवस निदान आणि उपचार…
महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान
17 पोलिस अधिकारी ‘पोलीस शौर्य पदक’ व 39 पोलिस कर्मचाऱ् GVयांना ‘पोलीस पदक” प्रदान नवी…
नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी – मेधा पाटकर
नांदेड(प्रतिनिधी)शिक्षणाचे बाजारीकरण वेगाने सुरु असतांना नांदेड एज्युकेशन सोसायटीकडून मूल्याधिष्ठीत शिक्षणातून समाजमन घडविण्याचे होत असलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन व हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्रता सैनानी प.पु.स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन…
