नांदेड- येथील सायन्स कॉलेज मैदानावर होत असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात संमेलनाच्या प्रचाराकरिता विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रमाई जयंतीनिमित्त सहयोग नगर, असर्जन व दगडगाव येथे तर भीमाई जयंतीनिमित्त नवीन कौठा येथील नालंदा बुद्ध विहारात विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आदिनाथ इंगोले यांची तर सहभागी कवी म्हणून डॉ. भीमराव हाटकर, अनुरत्न वाघमारे, दिगांबर घायाळे, अशोक कांबळे, आकाश चव्हाण, शिवाजी गोडबोले, थोरात बंधू, प्रज्ञाधर ढवळे, अर्चना भद्रे, प्रा. रंगनाथ नवघडे, सुभाष डोंगरे, डी. एन. मोरे खैरकेकर यांची उपस्थिती होती. महामाता भीमाई आणि महासूर्याची सावली माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही कविसंमेलन आणि एक मूठ धान्य आणि एक रुपया या मोहिमेचा प्रचार करण्यात येत आहे. मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्रोही कविसंमेलनाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामाता भीमाई, माता रमाई यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले. कविसंमेलनात अनेक कवी कवयित्रींनी सहभागी होत एकापेक्षा एक सरस व सुरस कविता सादर करून विद्रोहाचा आगाज केला. नालंदा बुद्ध विहार येथे झालेल्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. भीमराव हाटकर यांनी केले तर आभार शिवाजी गोडबोले यांनी मानले. यावेळी बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 989 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक थांबली की थांबवली? आपल्याच शिक्षकाकडून 3 हजारांची लाच स्विकारणारा केंद्रप्रमुख एसीबीच्या जाळ्यात