पोक्सो प्रकरणाचे दोषारोपपत्र बिलोली पोलीसांनी 24 तासात दाखल केले

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी एका अल्पवयीन मुलीला त्रास दिलेल्या प्रकरणात आरोपीला अटक करून 24 तासात न्यायालयात दोषारोप पत्र सादर करून गतीमान कार्यपध्दतीची झलक दाखवली.
दि.12 फेबु्रवारी रोजी मध्यरात्रीनंतर 3 वाजता दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 22/2026 नुसार एका टेलरने एका अल्पवयीन मुलीला आपल्याकडे बोलावले आणि तुझ्या आईचे कपडे घेवून जा असे सांगितले. ती मुलगी घरात आल्यावर दार आतून बंद केले. अल्पवयीन बालिकेला पलंगावर उभे करून तो दुसऱ्या रुममध्ये गेला. दरम्यान अल्पवयीन बालिका या सर्व प्रकाराला घाबरली आणि दार मधून बंद असलेले दार उघडून बाहेर पळत आली. पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधिक्षक कमल शिंदे, पोलीस उपनिरिक्षक विजय पंतोजी, लोखंडे, पोलीस अंमलदार मुद्देमवार, अंभुरे, धुमपटवाड, कठारे, वनशेट्टे आदींनी या प्रकरणातील आरोपी आमन बहाउद्दीन काझी (20) यास अटक करून 24 तासाच्या आत आरोपीसह दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. बिलोली पोलीसांची ही गतीमान कार्यपध्दती प्रशंसनिय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!