डॉ. किरण घोडके यांची एमडीसाठी निवड

नांदेड (प्रतिनिधी)-डॉ. किरण बिरुदेव घोडके यांची जे जे हॉस्पिटल येथे त्वचारोग तज्ञ पदव्युत्तर(MD Dermatology) अभ्यासासाठी निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे अभिनंदन होत आहे

किरण घोडके यांचे शालांत शिक्षण नांदेड शहरातील महात्मा फुले विद्यालयातून पूर्ण झाले त्यानंतर वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथून पूर्ण केले त्यानंतर आता त्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालय जे जे मुंबई येथे त्वचारोग पदव्युत्तर अभ्यासासाठी निवड झाली आहे नांदेड जिल्हा परिषद येथील बांधकाम विभागात कार्यरत असलेले उपअभियंता बिरुदेव घोडके यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने सर्वच स्तरात अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!