नांदेड(प्रतिनिधी)-नुकतेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण या अधिवेशनात एपस्टीन फाईल्स प्रकरणावरुन गोंधळ माजला होता. यात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून खा.राहुल गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिल गेल नाही. सभापती, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांनी खा.राहुल गांधी यांना बोलू दिल गेल नाही, त्यांची आडवणूक केली गेली. पण सभागृहात पंतप्रधान यांना जेवढे महत्व आहे तेेवढेच विरोधी पक्ष नेत्यांना महत्व आहे, असे मत खा.रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जिल्हा कॉंगे्रस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.यशपाल भिंगे, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, नगरसेवक सत्यपाल सावंत यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी खा.चव्हाण पुढे बोलतांना म्हणाले की, भारताने अमेरिकेसोबत केलेला करार हा कोणत्या आधारावर केला. नियात करावर 18 टक्के आणि आयात करावर 0 टक्के हा कोणता करार आहे. या कराराच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात आवाज उठविणार आहोत.एपस्टीन फाईल्स प्रकरणावरून देशाची नाचक्की झाली आहे. नुकत्याच केलेल्या करारावरून भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या अध्यक्षांसमोर लोटांगण घातले अशी परिस्थिती निर्माण झाली. हे सरकार हिंदुच्या हिताचे नसून हिंदु विरोधी असल्याची प्रतिमा वाराणसी येथील प्रकरणावरून समोर आली आहे. याचबरोबर राजकारणात काहीही होवू शकते असे खा.अशोक चव्हाण यांनी म्हटले असले तरी आगामी काळात खा.अशोक चव्हाणच कॉंगे्रसमध्ये येवू शकतात असा टोला खा.रविंद्र चव्हाण यांनी लगावला. विरोध पक्ष नेत्यावर आमचा दावा नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महापौर आणि उपमहापौर हा भारतीय जनता पार्टीचा असला तरी दोन नंबरच्या जागा कॉंगे्रस आणि वंचित बहुजन आघाडी या आघाडीला 15 जागा मिळाल्या आहेत. यामुळे आम्ही नोंदणी करत असतांना एकत्रच केली आहे. आमचा सभागृह नेता म्हणून वंचितचे इंजि.प्रशांत इंगोले यांची आम्ही निवड केली यामुळे दोन नंबरचा पक्ष म्हणून विरोधी पक्षावर आमचा दावा आहे. जर नियमाप्रमाणे नाही दिला तर आम्ही न्यायालयात दाद मागू असे खा.रविंद्र चव्हाणा म्हणाले. सोमवारी केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवशीय धरणे आंदोलन सध्या अमेरिकेतून एपस्टीन फाईल्सच्या संदर्भात जगभरामध्ये गोंधळ माजला आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जणांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसह नुकताच अमेरीकेसोबत केलेल्या शेतकरी कराराच्या विरोधातही दि.16 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत एक दिवशीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. Kanthak Suryatal Post Views: 887 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 16 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन बालाजी पंडित यांचे निधन