शेकडो लोक, काही पोलीसांसमक्ष नरसी गावात मारहाणीचा प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.12 फेबु्रवारी रोजी नरसी येथे दोन गटामध्ये झालेल्या हणामारीच्यावेळेस शेकडो लोक उपस्थित होते. सोबतच काही पोलीस सुध्दा उपस्थित होते. तरी पण मारहाण झालीच. पण या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्यांना त्या मारहाणीत दखल देवून मारहाण थांबवण्याची गरज वाटली नाही. यामुळेच समाजात असामाजिक तत्व पसरत असतात. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाचा काही गुन्हा नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही.
नरसी गावात गजानन शंकरराव भिलवंडे यांचे दुकान आहे. ते मागे पाच वर्षापुर्वी नरसीचे सरपंच होते. सध्या त्या सरपंच पदावर गजानन शिवाजी भिलवंडे विराजमान आहेत. या दोन भावकीच्या कुटूंबातील आपसातील वाद राजकारण आणि प्रभुत्वासाठी आहे. दोन्ही कुटूंबियांना नरसीच नव्हे तर पंचक्रोशीतील नागरीक ओळखतात.
काल सकाळी 10 वाजेच्यासुमारास गजानन शंकरराव भिलवंडे यांच्या दुकानात विरुध्द गटातील भिलवंडे कुटूंबियातील काही लोक घुसले आणि त्यांनी लाठ्या-काठ्या घेवून मारहाण सुरु केली. दुकानात असलेले काही लोक आणि विरुध्द बाजूचे लोक जास्त संख्येत त्या व्हिडीओत दिसतात. घटना घडताच बघ्यांची गर्दी जमली, काही पोलीस सुध्दा आले. पण मारहाण सुरूच राहिली. जनतेतील काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनविला आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. सध्या दोन्ही गटाकडील भिलवंडे कुटूंबियांची मंडळी दवाखान्यात उपचार घेत आहे. प्रश्न असा आहे की, व्हिडीओ बनविणाऱ्यांना हा मारहाणीचा प्रकार थांबवावा असे का वाटले नसते. जेवढे लोक त्या ठिकाणी जमले होते. त्यांनी फक्त जोरात गलका केला असता तरी मारहाण करणाऱ्यांचे हात थांबले असते. अशाच या तटस्थपणाच्या भुमिकेमुळे समाजात असामाजिक तत्वांचा वावर वाढत असतो. काही पोलीस होते पण पोलीसांची संख्या आणि मारहाण करणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर पोलीसांनी जोरदार हस्तक्षेप केला नाही ते काही अंशी बरोबर वाटते. पण समाजात एका पोलीसाच्या उपस्थितीने शंभर लोकांनी गोंधळ थांबवला पाहिजे अशी अपेक्षा असते. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाचा कोणता गुन्हा दाखल झाला याबाबतची माहिती प्राप्त झाली नाही.

संबंधित व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!