नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन शिवजयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करतात. याचाच एक भाग म्हणून जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय शिवजयंती मंडळाची नुकतीच स्थापना करण्यात आली. या शालेय शिवजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी तेजल शिखरे तर सचिवपदी सोनल गोडबोले यांची निवड करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., प्राथमिक पदवीधर शिक्षिका बडवणे एस. आर., विषय शिक्षक बेंबडे यु. एम., सहशिक्षक घटकार एस. एम., शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले यांची उपस्थिती होती.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त लोहा तालुक्यातील जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्थापन करण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी अशी: उपाध्यक्ष- अनन्या टिमके, कार्याध्यक्ष- मयुरी गोडबोले, कोषाध्यक्ष- शाहेद शेख, संघटक- विद्या गोडबोले, सदस्य – विश्वदीप झिंझाडे, प्रेम गोडबोले, सिद्धांत गोडबोले, पीरखाँ पठाण, अजिंक्य गोडबोले, नागेश मठपती. या मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शिव ज्ञान चाचणी, भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी सांगितले.
