लिटिल स्टार पब्लिक (प्रि प्रायमरी) स्कुलचे स्नेह संमेलन संपन्न

नांदेड –  लिटिल स्टार पब्लिक स्कुल प्रि-प्रायमरी, गणेश नगर रोड नांदेड सिडको नांदेड ह्या दोन्ही शाखेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल ताज पाटील येथे संपन्न झाला.
यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लोपामुद्रा आनेराव (एएसआय) नांदेड, सौ. भारती वाठोेरे (एएसआय) नांदेड, कु. अस्मिता गायकवाड  (स.गटविकास अधिकारी), लातूर, अ‍ॅड. दिपा बियाणी (संपादिका मानवी पुरवणी प्रजावाणी) समाजसेविका, सौ. अनुजा डोईफोडे (संपादिका मानसी पुरवणी, प्रजावाणी) समाजसेविका तसेच श्री मधुकर गायकवाड सर (विद्यादान कोचिंग क्लासेचे संचालक सिडको) तसेच मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई जयंतीने झाली. चिमुकल्यांनी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना आपल्या नृत्यातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, मुली व महिला खरच सुरक्षित आहेत का? ‘नारी शक्ती ड्रामा’ चिमुकल्यांनी सादर करुन प्रेक्षकांची व प्रमुख पाहुण्यांचे मने जिंकली. तसेच चिमुकल्यांनी वेगवेगळे ग्रुप डान्स, सोलो डान्स व अ‍ॅक्ट मधून आपले कौशल्य दाखवले. ह्यासाठी शाळेच्या संचालिका सौ. सुनंदा कदम  व शिक्षिकांनी तसेच नृत्य शिक्षक वाजिद  यांनी मेहनत घेतली. दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आजी-आजोबांचा मुलांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. कोमल एडके यांनी केले तर आभार सौ. स्वाती कदम यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!