नांदेड: कुष्ठरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. याच भावनेतून ” स्पर्श ” कार्यक्रम जिल्ह्यात सूरू असलेल्या कुष्ठरोग निर्मूलनाचे औचित्य साधून नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. शेख बालन यांनी नुकतीच नेरली येथील ‘नंदनवन कुष्ठधाम’ला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला व त्यांना आवश्यक साहित्याचे वाटप केले. साहित्य वाटप आणि आरोग्य तपासणी या भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते कुष्ठरुग्णांना विशेष प्रकारच्या एम.सी.आर. (MCR) चपला,आणि कुष्ठरुग्ण व प्रौढ मतिमंद मुलांना पौष्टिक खाद्यान्न आणि डिंकाच्या लाडूंचे वाटप करण्यात आले. केवळ साहित्य वाटप करून न थांबता, यावेळी विशेष आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये : – सर्व रुग्णांची सर्व प्रकारच्या रक्त तपासणी करण्यात आली. – बीपी (रक्तदाब) आणि शुगर (मधुमेह) तपासणी करण्यात आली. – रुग्णांना फॉलिक ॲसिड आणि रक्तवाढीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. स्वयंपाकघराची पाहणी आणि कर्मचाऱ्यांना सूचना डॉ. संगीता देशमुख यांनी कुष्ठधामातील स्वयंपाकघराची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, कुष्ठरुग्णांसाठी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचीही संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णांचा आहार सकस असावा आणि त्यांनी नियमित व्यायाम करावा, याबद्दल डॉ. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तसेच, कुष्ठरुग्णांना कोणत्याही आरोग्य सेवेपासून वंचित ठेवू नका, अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्या. नंदनवन कुष्ठधाम येथील श्री गायकवाड यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी मीरकुटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे, विस्तार अधिकारी सुरेश इंगळे आणि नेरली उपकेंद्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे कुष्ठरुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. > “कुष्ठरुग्णांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यांना केवळ औषधोपचारच नव्हे, तर मायेची आणि सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे.” Kanthak Suryatal Post Views: 876 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्री राजपूत समाजाचा ३३ व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न लिटिल स्टार पब्लिक (प्रि प्रायमरी) स्कुलचे स्नेह संमेलन संपन्न