रमाई जयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन; एक मूठ धान्य एक रुपया देण्याचे आवाहन नांदेड- येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी शहरात होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एक मूठ धान्य एक रुपया मोहिमेचा प्रचार करण्याच्या आणि अधिकाधिक लोकसहभाग वाढविण्यासाठी विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. माता रमाई जयंतीचे औचित्य साधून शहरातील सहयोगनगरस्थित माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारात पहिल्या विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गुलाबी थंडीतही कवी कवयित्रींनी विद्रोहाचा अंगार फुलविला. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनंत राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आदिनाथ इंगोले, डॉ. विलासराज भद्रे, डॉ. भीमराव हाटकर, दिगंबर घायाळे, विमल शेंडे, दत्ता तुमवाड यांची उपस्थिती होती. कविसंमेलनाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कविसंमेलनात दिगंबर घायाळे, इंजि. डॉ. विवेक मवाडे, क्रांतीकुमार पंडित, गयाताई कोकरे, जयाताई सूर्यवंशी, विमल शेंडे, अनुरत्न वाघमारे, थोरात बंधू, उज्वला पडलवार, प्रा. प्रल्हाद इंगोले, सदानंद सपकाळे, प्रज्ञाधर ढवळे, राहुल वाडे, मारोती कदम, डॉ. आदिनाथ इंगोले, नागोराव डोंगरे, दत्ता तुमवाड, इंजि. डॉ. भीमराव हाटकर, डॉ. विलासराज भद्रे, डी. एन. मोरे खैरकेकर, प्रफुल्ल कौडगावकर यांनी सहभाग नोंदविला. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. विलासराज भद्रे आणि डॉ. भीमराव हाटकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सदानंद सपकाळे यांनी केले. अध्यक्षीय समारोप डॉ. अनंत राऊत यांनी केला. एक मूठ धान्य एक रुपया’ देण्याचे आवाहन कविसंमेलनादरम्यान मान्यवरांनी विद्रोही साठी ‘एक मूठ धान्य आणि एक रुपया’ देण्याची मोहीम शहरातील विविध भागात जोर धरत आहे. सहयोग नगर परिसरातील बौद्ध उपासक उपासक उपासिकांना दान देण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. कवी कवयित्रींनी एकापेक्षा एक विद्रोही कविता सादर करून कविसंमेलनात रंगत भरली. यावेळी परिसरातील रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कविसंमेलनाच्या यशस्वितेसाठी माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार समितीने परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 578 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोनेरी केसांच्या मुलीची मागणी, काळे व्यवहार आणि राष्ट्रसुरक्षेचा सौदा श्री राजपूत समाजाचा ३३ व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न