नांदेड – मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिघजी औद्योगिक संस्था, नांदेड यांच्यावतीने सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. आयटीआय पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आयटीपास उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के.अन्नपुर्णे यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. मेकॅनिकल मोटर व्हेईकल, फिटर, टूल अँड डाय मेकर, पेंटर जनरल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल ट्रॅक्टर, वेल्डर, वेल्डर (जीएमएडब्ल्यू आणि जीटीएडब्ल्यू), शीट मेटल वर्कर आयसीटी एस एम, टर्नर , मशिनिस्ट ग्राइंडर ,वायरमन, मशिनिस्ट, फाउंड्रीमॅन इ. व्यवसायाचे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत.
More Related Articles
फेसबुक व सोशल मिडीयाच्या माध्यमातून १९८४ चे वर्गमित्र आले एकत्र, झाला स्नेहसंमेलन सोहळा
नांदेड, (प्रतिनिधी)-सोशल मिडीया आणि फेसबुकच्या माध्यमातून सर्व जुन्या मित्रांना एकत्र आणून त्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित…
फौजदार प्रविण आगलावे साहेब खंडणीचा फरार आरोपी न्यायालय परिसरात आहे
खंडणीचा आरोपी कोर्टात, शोध मात्र कागदावर’! — एक उपरोधिक वास्तव नांदेड (प्रतिनिधी) — कायद्याच्या अंमलबजावणीची…
गुरुद्वारा चौरस्तावरील लोखंडी पादचारी पुल हटवा ;कुंजीवाले व संधू यांची मागणी
नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील सचखंड गुरुद्वारा चौकामध्ये महानगरपालिका च्या वतीने 2008 साली लोखंडी पादचारी पुल…
