नांदेड-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नुकतेच तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केलेल्या विद्युत सहाय्यकांना तंत्रज्ञ पदावर सामावून घेतले असून यात प्रियंका सूर्यतळे -बावस्कर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश काढले असून या आदेशात तीन वर्षे कंत्राटी कालावधी पूर्ण केलेल्या पाच विद्युत सहायकांना तंत्रज्ञ पदावर सामावून घेतले आहे. यात प्रियंका सूर्यतळे -बावस्कर यांचा समावेश असून त्यांना संचलन व सुव्यवस्था उपविभाग २ नांदेड या ठिकाणी तंत्रज्ञ पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कायम झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
