भोकर – आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील ,जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.कांतीलाल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” जागतिक कर्करोग दिन ” साजरा करण्यात आला. दंत शल्य चिकित्सक डॉ.मायादेवी नरवाडे यांनी बाह्य रुग्ण विभागात रुग्णांना मौखिक कर्करोगाविषयी माहिती सांगून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या तसेच या वर्षीचे घोष वाक्य ” United for Unique ” म्हणजेच ” अद्वितीयसाठी एकजूट होऊया ” हे घोषवाक्य सांगितले व सर्व रुग्णांची मौखिक तपासणी केली. तसेच एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी यांनी कर्करोगाविषयी विस्तृत माहिती सांगून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या. यावेळी डॉ. थोरवट ,डॉ. मुदसिर, सहाय्यक अधीक्षक संजय देशमुख, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, औषध निर्माण अधिकारी शिवप्रसाद जाधव, कनिष्ठ लिपिक कल्याणकर, एनसीडी समुपदेशक रेणुका भिसे, अधिपरिचारिका श्रीमती भालेराव, अधिपरिचारिका श्रीमती ज्योती शेंडगे,दंत सहाय्यक श्रीमती करंडेकर आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
More Related Articles
जवळा देशमुख येथे पाचवी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
शिक्षण परिषदेतील चर्चासत्रांना शिक्षकांचा प्रतिसाद; बाल सुरक्षेसाठी विविध विषयांवर घडून आले विचारमंथन नांदेड- शालेय शिक्षण…
नायगाव मध्ये जादूटोणा प्रकरण उघड! सात जणांवर गुन्हा दाखल
गुप्तधनाच्या हव्यासापोटी शेतात खोदकाम; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त नायगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गडगा शिवार परिसरात जादूटोणा…
लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी अटकेत – २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
हदगाव (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर विहिरीसाठी सोलार, तुषार सिंचन व ठिबक…
