नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी दि.1 फेबु्रवारी रोज रविवारी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. यात महाराष्ट्राला झुकते माप देत खर्या अर्थाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे काम या अर्थसंकल्पातून करण्यात आले असल्याचे मत राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला आ.राजेश पवार, जिल्हाध्यक्ष ऍड. किशोर देशमुख, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, डॉ.सचिन उमरेकर, चैतन्य बापू देशमुख, प्रविण साले यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. ना.बावनकुळे पुढे बोलतांना म्हणाले की, पुणे हैद्राबाद कॅरिडॉरचा फायदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे. कारण पुणे हैद्राबाद हे अंतर 2 तासांमध्ये गाठता येणार आहे. यामुळे पुणे आणि हैद्राबाद हे दोन महानगरे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणून घोषित करण्यात आले आहेत. याचबरोबर शेती विकासाच्या बाबतीत अनेक तरतुदी यात करण्यात आल्या आहेत. पशुधनाची उपलब्धता वाढविण्यासाठी सवलतीच्या दरात व्याजाने कर्ज दिले जाणार आहे. कृषी शिक्षण घेण्यासाठी कर्ज सलग्न सहाय्य योजना, फळे आणि भाजीपालासाठी 30 ते 40 टक्के नासाडी होत होती. यामुळे साठवणूक कार्यक्षमतेत सुधारणा करण्यात आली आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या विकासाला चालणा देणारे हे अर्थसंकल्प ठरणार आहे असे मत राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले. लातूर आणि नांदेडच्या ल ोकप्रतिनिधींना एकत्र बसवून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणार्या महसुल आयुक्तालयाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार आहे. खर्या अर्थाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील कारभार छत्रपती संभाजीनगर येथील महसुल आयुक्त कार्यालय चालवित आहे. यामुळे या कार्यालयाचे विभाजन झाल पाहिजे आणि प्रशासकीय कामकाजात सुलभता आली पाहिजे या दृष्टीकोणातून लवकरच दुसर्या महसुल आयुक्तालयाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मत ना.बावनकुळे यांनी व्यक्त केले. महापौरांचा निर्णय राज्याची कोर कमिटी घेणार आहे. यावेळी पत्रकारांनी महापौर निष्ठावंत की नवीन असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी ना.बावनकुळे यांनी हा निर्णय राज्याची कोरकमिटी ठरवित असते. त्यामुळे महापौर निवडीचे अधिकार आता स्थानिक नेतृत्वाकडे नसल्याचे या विधानावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नांदेडचा पहिला भारतीय जनता पार्टीचा महापौर निष्ठावंत होणार की, भाजपात नवीन दाखल झालेल्यांना संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 583 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राष्ट्रवाद की भीती? नरवणे यांच्या पुस्तकामुळे लोकशाही का हादरली? राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन