नांदेड(प्रतिनिधी)-अवसायनात निघालेल्या संस्थेच्या नावावर स्वस्त धान्याचा पुरवठा तहसील कार्यालयाकडून घेवून मागील दहा वर्ष शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुध्द नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गजानन तुकाराम तमलुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 डिसेंबर 2014 ते 11 जानेवारी 2024 दरम्यान पानसरेनगर नायगाव येथील सय्यद रहिम सय्यद मीर (58) आणि सय्यद रहेमान सय्यद मीर (52) या दोघांनी संगणमत करून दत्तात्रय हामाल औद्योगिक सहकारी संस्था मर्यादी नायगाव ही संस्था अवसायनात निघाल्यानंतर देखील तहसील कार्यालय नायगाव यांच्याकडून संस्थेच्या नावावर स्वस्त धान्याचा पुरवठा घेतला. या 12 वर्षात त्यांनी दर महा 100 ते 150 क्विंटल गहु, तांदुळ, दाळ, साखर आणि तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तु घेतल्या मात्र लाभधारकांना वितरीत केल्या नाहीत आणि त्या साहित्याची गैरमार्गाने विक्री केली. दरम्यान या संस्थेचे सचिव मरण पावलेले असतांना त्यांच्या नावाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची फसवणूक केलेली आहे. या तक्रारीवरुन नायगाव पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471 आणि 34 प्रमाणे गुन्हा क्रमांक 18/2026 न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मोबईल नंबर 8975832298 हेकरीत असल्याची माहिती पोलीस प्रेसनोटमध्ये दिली आहे.
12 वर्ष स्वस्त धान्य घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल
