उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अवैध वाळू कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-महसुल विभागाने पोलीस ठाणे उस्माननगरच्या हद्दीत तीन ठिकाणी अवैध वाळू माफियांविरुध्द कार्यवाही करत 3 कोटी 97 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कार्यवाही करून 3 लाख रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ग्राम महसुल अधिकारी मोतीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सज्जा हातणी ता.लोहा येथील ग्राम विकास अधिकारी आहेत. दि.7 जानेवारी सायंकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान त्यांनी मौजे कौडगाव फाटा येथे नदीपात्रात छापा टाकला. तेथे एक टिपर क्रमांक एम.एच.24 ए.यु.2669 तसेच दोन पोकलॅंड मशिन, 4 ब्रास वाळू असा एकूण 60 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी पळून गेलेले भगवान शिवाजी पवार रा.मारतळा, गोविंद रमेश भरकडे रा.कौडगाव आणि अंकुश साहेबराव गवळे या तिघांविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 4/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक हंबर्डे हे करीत आहेत.
सज्जा वाका ता.लोहा येथील ग्राम महसुल अधिकारी लक्ष्मण नागोराव गोधणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 जानेवारीच्या रात्री 10 ते 10.45 वाजेदरम्यान त्यांनी मौजे येळी येथील गट क्रमांक 297 आणि 286 मधील गोदावरी नदीच्या काठावर छापा टाकला. तेथे तीन हायवा टिपर, आठ पोकलॅंड, एक लोखंडी फायबर बोट आणि चार तराफे, चार ब्रास वाळू असा 2 कोटी 96लाख 21 हजारांचा ऐवज सापडला. याप्रकरणी शिवाजी बालाजी येडे आणि इतर 12 लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 5/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक गाडेकर अधिक तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत लक्ष्मण नागोराव गोधणे या ग्राम विकास अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान मौजे येळी गावातील गोदावरी काठावर त्यांनी छापा टाकला तेंव्हा संदीप वसंत शिंदे रा.जोमेगाव ता.लोहा हा दोन मोठ्या लोखंडी फायबर बोट, दोन छोट्या लोखंडी बोट याच्या सहाय्याने अवैध पणे वाळू उपसा करत होते. पथकाला पाहुन तो पळून गेला. त्या ठिकाणी एकूण 42 लाखांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 6/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार चिंचोरे अधिक तपास करीत आहेत.
चौथ्या घटनेत सज्जा उनकदेव ता.किनवटचे तलाठी आकाश रमेश राजपोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे लिंगी ता.किनवट येथे 3 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास ट्रक्टर क्रमांक टी.जी. 36 -9049 मध्ये अवैध वाळू चालली होती. त्या ट्रक्टरला थांबवली तेंव्हा रेती खाली पाडून ट्रक्टरमधील चालक पळला होते. परंतू त्यांना पकडण्यात आले. त्यांची नावे मारोती यादव किनाके (35) आणि दत्ता स्वामी निलमेलवार (30) दोघे रा.लिंगी ता.किनवट यांच्याविरुध्द मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 4/2026 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार असवले हे करीत आहेत.
4 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
