नांदेड (प्रतिनिधी )-|महर्षि मार्कण्डेय जन्मोत्सवानिमित्त दत्तनगर येथील श्री गणेश, श्री हनुमान व महर्षि मार्कण्डेय मंदिर येथे बुधवारपासून (दि.१४) अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. २१ जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ४.३० ते ६ काकडा भजन, ६.३० ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते दुपारी १२ गाथा भजन, दुपारी १२ ते २ महिला भजन, २ ते ४ संतकथा अमृत, सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ, रात्री ७ ते ११ हरिकीर्तन व जागर होणार आहे. ज्ञानेश्वारी पारायणाचे प्रमुख बंडू महाराज, हरसदकर हे असून माधव महाराज सुंकेवार (येलूरकर) हे कथेचे निरूपन करणार आहेत. १४ रोजी माधव महाराज सुंकेवार, येलूकर यांचे किर्तन झाले. १५ रोजी दिपक महाराज, बादाडे, बीड, १६ रोजी भागवताचार्य अंजलीताई केंद्रे, लातूरकर, १७ रोजी विलास महाराज गेजगे, बोथीकर, १८ रोजी ज्योतीताई धनाडे, जालना, १९ रोजी परमेश्वर महाराज गोंटेलवार, शहापूरकर, २० रोजी मधुकर महाराज सायाळकर, परभणी, २१ रोजी कृष्णा महाराज शास्त्री, कोंडिबा महाराज संस्थान धानोरा तीर्थ, अहमदपुर यांचे हरिकीर्तन होणार आहे. २१ रोजी महर्षि मार्कण्डेय जन्मोत्सव शोभायात्रा मिरवणूक सकाळी ११ ते २ पर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पद्यमशाली समाज दत्तनगरच्या वतीने करण्यात आले आहे.
महर्षि मार्कण्डेय जन्मोत्सवानिमित्त दत्तनगरमध्ये हरिनाम सप्ताहाला सुरूवात
