मनपा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर प्रथम तारुचा बोलका रॅप

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील युवक प्रथम युवराज तारु याने सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तयार केलेला गायब नेता नावाचा रॅप अत्यंत बोलका आहे.
या रॅपच्या सुरूवातीलाच प्रथम तारु सांगतात गायब नेता गायब वादा या रॅपमध्ये घेतलेले चित्रीकरण एवढे बोलके आहे की, आम्ही आमके केले आम्ही टमके केले असे म्हणाऱ्या नेत्यांच्या तोंडावर ती थापडच आहे. नेता गायब आहे हे दाखवतांना प्रथम तारु त्या वस्त्यामध्ये फिरत आहे त्यावस्त्यांमध्ये नेता कधी आला होता की, नाही हे माहित नाही. मागील पाच वर्षापासून नेता गल्लीतच आला नाही असा आरोप प्रथम तारु करतात. प्रथम तारु आपल्या रॅपमध्ये सांगतात की, माहित आहे सर्व माहित आहे पुढे जनतेचे काय हाल होणार आहेत. या गल्यांमध्ये नाल्या भरलेल्या आहेत. कचऱ्यांचे ढिगार साचलेले आहेत. त्या ढिगाऱ्यांमध्ये जनावरे आपले जेवण शोधत आहेत आणि या गल्यांमधील बालके या घाणेरड्या वातावरणात आपल्यासाठी आनंदाची जागा शोधत आहेत.
नेते खोटे आश्र्वासन देतात, व्हिडीओमध्ये खोटे बोलतात हे सांगत असतांना रॅपमध्ये दिसणारा दृश्यांची एक साखळी अत्यंत बोलकी आहे. नळाला पाणी येते परंतू ते पिण्याच्या लायकीचे पण नाही आणि ते सुध्दा चार दिवसाला एकदा येते असे या रॅपमधील आरोप आहे. या गल्यांमध्ये काही कामांनिमित्त आलेल्या लोकांना आपल्या नाकाला रुमाल बांधवावे लागतात ही स्वच्छतेची अवस्था आहे. कचऱ्यासाठी घंटा गाडी येते असे नेत्यांनी जाहीर केले आहे. परंतू ती घंटाच येते. आता निवडणुक आली आहे आणि आता भिक मागण्यासाठी पुन्हा हेच पाच वर्ष गायब झालेली नेते दिसायला लागले आहेत. भावी नगरसेवक या नावावर मागील अनेक दिवसांपासून प्रचार अगोदरच सुरू होता आत प्रत्यक्षात मतांची भिक मागण्यासाठी हेच नेते गल्लोगल्ली दिसत आहेत. सत्ताधारी लाच खातात आणि हाल गरीबांचे होतात असा उल्लेख या रॅपमध्ये आहे.
शब्दांच्या सिमा कधीच बांधलेल्या नाहीत. प्रथम तारुने निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर तयार केलेला हा गायब नेताचा हा रॅप अत्यंत बोलका आहे. महानगरपालिका निवडणुकीतील प्रत्येक मतदाराने हा रॅप पाहून आपल्या हक्काचे मतदान कोणाला द्यावे याचा विचार करावा.

संबंधीत रॅप…

GAYAB NETA | PRATHAM TARU
🙏🏻❤️
DISCLAIMER
हा गाण्यातील मजकूर पूर्णपणे काल्पनिक आहे.
कोणत्याही राजकीय पक्ष, नेता किंवा व्यक्तीशी याचा थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही.
हे गाणे सामाजिक वास्तवावर आधारित कलात्मक अभिव्यक्ती असून कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाही
हे केवळ सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आहे
PLEASE LIKE SHARE AND SUBSCRIBE CHANNEL 🙏🏻❤️

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!