नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी तर मतमोजणी शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. याअनुषंगाने गुरूवार 15 जानेवारी रोजी सिडको / हडको परिसर नांदेड व शुक्रवार 16 जानेवारी गांधी मैदान गोकुळनगर नांदेड येथील भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.

याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये निर्गमीत केला आहे. या आदेशात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड क्षेत्रात भरणारे वरील आठवडी बाजार हे शनिवार 17 जानेवारी 2026 रोजी भरविण्यात यावेत, असे नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!