नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी नगीनाघाट जवळ झालेल्या गोळीबारात एक दुसऱ्याविरुध्द जिवघेणा हल्ला या सदरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोळी मारणाऱ्याला सुध्दा लाकडाने मारतांनाचे व्हिडीओ समोर आले आहेत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये दिसणाऱ्यांपैकी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे आणि दुसऱ्याला शोधण्यासाठी वजिराबाद पोलीसांचे पथक राज्याबाहेर रवाना झाले आहे.
काल सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास नगीनाघाट परिसरात दोन गटांमध्ये भरपूर हाणामारी झाली. त्याचा ईतिहास सकाळपासूनच सुरू झाला होता आणि सायंकाळी पुन्हा तो मुद्दा जोरात आला आणि हाणामारी झाली. या हाणामारीत काही जण दुसऱ्यांना मोठ-मोठ्या लाकडांनी मारहाण करत होते. मार खाणाऱ्यांपैकी एकाच्या हातात बंदुक होती. त्या बंदुकीतून त्याने गोळी झाली. ती गोळी तेथे दुकानदार असलेल्या कमलप्रितसिंघ अमरदिपसिंघ सिधु यांच्या पायातून आरपार निघून गेली आणि दुसरे एक स्थानिक व्यक्ती परमजितसिंघ चावला यांना काठीचा मार लागला आहे.
या संदर्भाने कमलप्रितसिंघ अमरसिंघ सिधु यांच्या तक्रारीवरुन दोन अनोळखी व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 118(1), 3(5) आणि शस्त्र कायदा कलम 3/25 आणि 7/25 नुसार गुन्हा क्रमांक 4/2026 दाखल करण्यात आला आहे. आपल्या तक्रारीत कमलप्रितसिंघने लिहिले आहे की, यात्रेकरूंचे भांडण सोडविण्यासाठी मी त्यामध्ये गेलो असता मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर पिस्तुल रोखून गोळी झाडली. जी माझ्या पायाला लागली आहे. तसेच परमजितसिंघ चावला याच्यासोबत वाद करून त्याच्या डोक्यात लाकडाने मारले आहे.
या विरुध्द पंजबा राज्यातील यात्रेकरू लवप्रितसिंघ बलविरसिंघ चहल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जानेवारी रोजी ते आणि त्यांच्यासोबत अनेक जण बिदर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे चार-पाच जण दारु पित असतांना त्यांना सांगितले की, येथे दारु पिऊ नका. 3 जानेवारी रोजी आम्ही सकाळी आपल्या गाडीजवळ गेलो असतांना त्यांच्या आणि गुरविंदरसिंघ (अमरितसिंघ)व हरप्रितसिंघ यांच्या गाडीचे डायर फाटलेले होते. मला अर्शदिपसोबत सोडून बाकीचे रेल्वेने नांदेडला आले. 3 तारखेला आम्ही सायंकाळी 5 वाजता लंगर साहिब गुरुद्वारा येथे आलो असतांना 2 ज ानेवारी रोजी बिदर येथे दारु पिऊन आमच्याशी भांडणारा युवक व इतर काही युवक आमच्या आले आणि आमच्याशी भांडण करू लागले. जिवे मारण्याच्या धमक्या देऊ लागले. त्यात एकाने हरप्रितसिंघच्या गळ्यावर मॅन असलेल्या तलवारीने वार केला. तेथून आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांच्यातील काही जण तलवारी घेवून आणि काठ्या घेवून आमच्या मागे लागले. आम्ही पळून जात असतांना गु रविंदरसिंघ (अमरितसिंघ) याने त्याच्याकडील बंदुकीतून एक गोळी झाडली. या भांडणात आम्ही सर्व जिवाच्या भितीने वेगवेगळ्या रस्त्याने पळून गेलो. या तक्रारीत आरोपीच्या सदरात कमलप्रितसिंघ, परमजितसिंघ चावला, कुणाल नंबरदार, बलप्रितसिंघ चावला, मनज्योतसिंघ आणि गोपी अशा सहा जणांची नावे आहेत. या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190, 118(1), 352, 351(2) आणि शस्त्र कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 6/2025 दाखल केला आहे.
वास्तव न्युज लाईव्हला उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळा टीशर्ट परिधान केलेल्या युवकाच्या हातात बंदुक आहे. त्यानेच ती गोळी झाडल्याचे दिसते. तसेच दुसरा एक युवक हिरव्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेला आहे. हेच ते दोन अनोळखी व्यक्ती असावेत. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार यातील हिरव्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेला युवक पोलीसांच्या ताब्यात आहे. परंतू गाळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेला युवक फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी नांदेड पोलीस पथक पंजाब राज्याच्या मार्गावर आहे.
संबंधीत बातमी…
बिदरमधील वादाचे पडसाद नांदेडमध्ये; पंजाबहून आलेल्या प्रवाशाकडून गोळीबार, युवक जखमी
संबंधीत व्हिडीओ…
