नांदेड -आज दिनांक 27 डीसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार पथक प्रमुख नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी संतोष अस्कुलकर, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, प्रमोद बडवने, ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, गौतम पांढरे, एम.के.पाटील, मनोज जाधव, मनोज सरपे, दिलीप पवार, आढाव, मोहन कदम, सचिन उपरे, रमेश गिरी, माधव शिराळे महसूल सेवक शिवा तेलंगे यांचे महसूल पथक त्रिकुट परिसरामध्ये सकाळी 6 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना त्रिकुट संगमजवळ रेती उत्खनन करणारे 3 मोठी बोट , एक छोटी बोट आढळून आले.



पथकाने मजुरांच्या साह्याने 2 मोठी बोट बुडवून टाकले तर एक मोठी बोट व 1 लहान बोट जिलेटीने स्फोट करून नष्ट केले.असे एकूण 35 लाख किमतीचा मुद्देमाल पाण्यात बुडवून व स्फोट करून नष्ट करण्यात आला.अवैध उत्खननासंदर्भात महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
