नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेला टेम्पो पकडला आहे. टेम्पोची किंमत 3 लाख आणि 1 ब्रास वाळूची किंमती 5 हजार असा एकूण 3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे आणि पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार अर्जुन मुंढे, शंकर माळगे, समीर अहेमद यांनी 26 डिसेंबर रोजी दुपारी नांदेड-लोहा रस्त्यावरील एम.एच.26 या बार रेस्टॉरंटसमोरून जाणारी चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.31 सी.बी.3524 थांबवली. त्या गाडीला थांबवून कागदपत्रांची तपासणी केली. तेंव्हा तो समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. या संदर्भाने पोलीस अंमलदार गवेंद्र सिरमलवार यांच्या तक्रारीवरुन या वाहनाचा चालक दिक्षीत बापुराव पट्टेकर आणि गाडीचा मालक पिंटू घोगरे या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 1226/2025 दाखल करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूचा टेम्पो पकडला
