नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद शहरातील आनंदनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच चिकाळा तामसा ता.हदगाव येथे चोरट्यांनी घरफोडून 70 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
धर्माबाद येथील सचिन नागनाथ चंदापुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 डिसेंबर 2025 च्या रात्री 8 ते 25 डिसेंबर 2025 च्या पहाटे 6 वाजेदरम्यान आनंदनगर धर्माबाद येथील त्यांचे घर फोडून चोरट्यांनी कपाटातील 33 ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि 95 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 350/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक माधव लोणेकर अधिक तपास करीत आहेत.
सुदाम सटवा सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान त्यांच्या चिकाळा तामसा ता.हदगाव येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक तोळ्याच्या सोन्याची पोत आणि 30 हजार रुपये रोख रक्कम असा 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 219/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद तालुक्यात घरफोडून 3 लाखांची चोरी
