नांदेड -मागील जवळपास ३५ ते ४० वर्षापासून असर्जन येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत राहणार्या सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पाटबंधारे विभागाने नोटीस बजावत गाळे खाली करण्याची सूचना केली आहे. पाटबंधारे विभागाने या सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा अशी मागणी केल्यानंतरही पुन्हा नोटीस बजावण्यात आल्याने असर्जन वसाहतीतील नागरकांनी मनपा निवडणुक मतदानावर बहीष्कार टाकला असुन त्या संबंधाने भगतसिंग चैकात बॅनर देखली लावण्यात आले. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवास रूोजनेच्या माध्यमातुन घरे देत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सरकार सेवाबेघर करत असल्याचा मजकुर या बॅनरवर प्रकाशित करण्यात आला.
नांदेड शहरातील असर्जन या ठिकाणी असलेल्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत राहणार्या सेवानिवृत्त कर्मचार्यांना पाटबंधारे कार्यालयाकडून गाळे खाली करण्यासंदर्भात नोटीस देण्यात येत आहे. ज्यावेळी हा भाग ओसाड होता, दळण-वळणाची व्यवस्था नव्हती. शहरापासून दूर असलेल्या अशा भागात राहून कर्तव्यावर असलेल्या तत्कालीन कर्मचार्यांनी कुठलीही सुविधा नसताना कर्तव्य बजावत शासनाची सेवा केली. या सेवानिवृत्त कर्मचार्यांचे गाळे खाली करून घेण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करावे किंवा ते ज्या गाळ्यात राहतात त्या गाळ्यावर त्यांचा कब्जा द्यावा, त्यांच्या मालकीचे करावे शक्य असल्यास शासकीय दरानुसार त्यांच्याकडून गाळ्याची किंमत वसूल करावी. अशी मागणी दि. १५ व १६ डीसेंबर रोजी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यत आली. तसेच या संदर्भाने खा. अशोक चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. आनंद बोंढारकर, आ. बालाजी कल्याणकर यांची भेट देखील घेण्यात आली.
परंतु त्यांनतरही पुन्हा दि.१९ डीसेंबर रोजी पाटबंधारे विभागाने घर खाली करण्यासंदर्भाने नोटीस दिल्याने अखेर या वसाहतीत राहणार्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधाने पहाटे असर्जन येथील भगतसिंग चौकात बॅनर लावण्यात आले होते.
