लोहा(प्रतिनिधी)-लोहा येथील पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या नेतृत्वात लोहा पोलीसंानी शिवाजी चौक लोहा ते कंधारकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक हायवा गाडी पकडली असून ज्यामध्ये चोरीची वाळू भरलेली होती.
पोलीस अंमलदार बालाजी वसंतराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.22 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास लोहा पोलीस पथकाने शिवाजी चौक लोहा ते कंधार रस्त्यावर हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एच.7822 पकडली. त्यामध्ये 5 ब्रास वाळू भरलेली होती. याबाबत विचारणा केली असता समाधानकार उत्तर मिळाले नाही. लोहा पोलीसांनी 18 लाखांची हायवा गाडी, 25 हजारांची वाळू असा 18 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि मारोती माधव केंद्रे (30) रा.बामणी ता.कंधार आणि दिपक सुर्यवंशी रा.चितळी ता.लोहा यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 392/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक खाडे अधिक तपास करीत आहेत.
लोहा पोलीसांनी अवैध वाळूची हायवा गाडी पकडली
