कंधार(प्रतिनिधी)- कंधार बसस्थानकात पती-पत्नी बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असतांना पत्नीच्या पर्समधील 1 लाख 67 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत.
शिवाजी मारोती पवार हे आणि त्यांची पत्नी दि.23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास कंधार बसस्थानका नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत असतांना त्यांच्या पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेले 1 लाख 67 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. कंधार पोलीसांनी या प्र्रकरणी गुन्हा क्रमांक 421/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार डिकळे अधिक तपास करीत आहेत.
कंधार बस स्थानकात महिलेचे दागिणे चोरले
