नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्रातील आठवडी बाजार मतदान व मतमोजणीच्या दिवशी राहतील बंद

नांदेड  जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सुधारित सार्वत्रिक निवडणुक-2025 च्या अनुषंगाने नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी व मतमोजणी दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.  हे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत, अशा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अॅक्ट1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन निर्गमीत केला आहे

नांदेड जिल्ह्यातील निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी व रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिनांकास आदेशात नमुद केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतक्षेत्रात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेशीत केले आहे.

निवार 20 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणाची नावे निरंक आहेत. तर रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाण बिलोली, धर्माबाद, मुदखेड, किनवट या नगरपरिषदेचा यात समावेश आहे. देगलूर, हदगाव, नगरपंचायत हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुखेड, उमरी, भोकर, लोहा या नगपरिषद निरंक आहेत. या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत. हा आदेश 11 डिसेंबर 2025 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!